सेउल : दक्षिण कोरियाच्या नौदलाचे एक विमान गुरुवारी प्रशिक्षणादरम्यान कोसळले. या विमानात चार क्रू मेंबर्स होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.पी-३ सी या नौदलाच्या गस्ती विमानाने गुरूवारी दुपारी दीड वाजता पोहांग येथील तळावरून उड्डाण केले; परंतु काही वेळातच ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. दोन कू्र मेंबर्सचे मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले. दोघांचा शोध अद्याप लागलेला नाही. बचाव पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
Fans
Followers